मुंबई : शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'जनता दरबाराचे' आयोजन बाळासाहेब भवन, मुंबई येथे करण्यात आले होते.
या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीसाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या विश्वासावर आधारित असे उपक्रम सतत राबवले जातील आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन नेहमी तत्पर राहील. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

