Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

तारकर्ली स्वामी समर्थ मठ येथे २ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा

तारकर्ली स्वामी समर्थ मठ येथे २ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा

२० व्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त २ व ३ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे मालवण तालुक्यातील तारकर्ली गावात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आगमन होणार आहे. श्री स्वामी समर्थ मठ तारकर्ली २० व्या वर्धापन दिन निमित्ताने पालखी पादुका दर्शन सोहळा व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २ व ३ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.

रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्रीमूर्तीवर अभिषेक त्यानंतर सकाळी ८:३० वाजता श्री दत्त मंदिर वायरी बांध येथून पालखीचे भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा व दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर १२:३० वाजता महाप्रसाद होणार आहे.

सायंकाळी ४ वाजता सखी फुगडी संघ पावशी यांचा फुगडी कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रीमूर्ती ची पूजा सायंकाळी ७ वाजता महाआरती व रात्रौ ८ वाजता ह. भ. पं. गोविंद आसोलकर बुवा बाव कुडाळ यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता मान्यवरांचे सत्कार समारंभ झाल्यानंतर रात्रौ ठीक १० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप नेरुर कुडाळ यांचा नेरूरच्या पारंपारिक लोककलेचा मांड उत्सव संपन्न होणार आहे.

सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता श्रीमूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती व सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रुक्माई भजन मंडळ खैदा कातवड यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती झाल्यानंतर रात्रौ ८ वाजता श्री महापुरुष महिला भजन मंडळ तारकर्ली वरची वाडी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. रात्रौ ठीक १० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा श्री स्वामी समर्थ चरित्रावर आधारित ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

तरी सर्व स्वामी भक्तांनी पालखी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजेंद्र तारी, ज्योतिष भास्कराचार्य, अशोक मयेकर, अँड. रुपेश परुळेकर व स्वामी समर्थ मठ तारकर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे

rapan bottom