गतिमान महाराष्ट्र हाच भाजपाचा संकल्प
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी ३ आंतरमार्गिकांचे लोकार्पण ही संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या मार्गाने वाहतूक करता येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर पार करण्यासाठी दीड तास लागत होता, मात्र आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे फक्त १० ते १५ मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. इतकंच नव्हे तर, या मार्गावरून वांद्र्याला पोहोचून, तिथून पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून दहिसरपर्यंत सिग्नल-फ्री प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शहरे वेगवान होत असून महाराष्ट्रवासियांना जलद, सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळत आहे. असा विश्वास भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

