Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या त्रासा बाबत कमलाकर खोत यांचे मालवण पालिके समोर प्रजासत्ताक दिनी उपोषण

मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या त्रासा बाबत कमलाकर खोत यांचे मालवण पालिके समोर प्रजासत्ताक दिनी उपोषण

मालवण पालिकेच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण स्थगित

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांचा बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण केले.

मालवण शहरात अनेक वर्षापासून भटके कुत्रे , गुरे यांची संख्या वाढली आहे. हे मोकाट कुत्रे वृद्ध, लहान मुलांवर हल्ले करून जखमी करत आहेत. त्याचबरोबर अपघात होत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. ‘रात्री कुत्री वाहनांमागे धावत येऊन हल्ला करीत आहेत. याबाबत वारंवार पालिकेकडे मागणी करूनही पालिका लक्ष देत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा असे ते म्हणाले.

उपोषण स्थळी पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, मालवण नगरपरिषद कर्मचारी उपोषण स्थळी दाखल झाले होते. कुत्रे निर्बिजीकरण बाबत टेंडर प्रक्रिया काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश देऊन पुढील प्रक्रिया कार्यवाही सुरु आहे. मोकाट जनावरांना पकडणे बाबत कोणी टेंडर भरले नाही. पुन्हा टेंडर प्रक्रिया केली जाईल असे सांगण्यात आले. त्या नंतर पी.आय. कोल्हे यांच्या हस्ते पाणी पिऊन कमलाकर खोत यांनी उपोषण सोडले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक यतिन खोत, महेश जावकर, सामाजिक कार्यकर्ता तथा प्राणी प्रेमी शिल्पा खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, भाई कासवकर, मंदार ओरोसकर, मनोज मोंडकर, निखिल शिंदे, साई वाघ, शशी खोत, गणेश चव्हाण, शांति तोंडवळकर, बंड्या सरमळकर यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom