Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान

सिंधुदुर्ग : प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.उल्लेखनीय सेवेबद्दल अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, अन्वेषण' प्राप्त झाले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

सन 2023 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यामध्ये पोलीस मुख्याल येथील राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरक्षक संदिप अशोक भोसले, चिपी विमातळ येथील पोलीस उप निरीक्षक प्रताप विठोबा नाईक, जिल्हा विशेष शाखा मनोज मारुती मांजरेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार विश्वजीत झीलू परब, निवती पोलीस ठाणे येथील श्रीमती अर्चना गोविंद कुडाळकर, स्थागुअशा सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार प्रकाश सहदेव कदम, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार संजय ज्ञानोबा साळवी,स्थागुअशा, सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार डॉमनिक संतान डिसोजा, वैभववाडी पोलीस ठाणे येथील पोलीस शिपाई राहुल भगवान तळसकर यांचा समावेश आहे.

जिल्हा कृषि विभागामार्फत उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांना जिल्हा कृषि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे आंबा उत्पादनामध्ये हापूस आंबा प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तसेच अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे लाल भेंडी 17 फूट 10 इंच उंच एवढे विकसीत केल्याने वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

rapan bottom