Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ मध्ये रंगला प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा

कुडाळ मध्ये रंगला प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा

कमशिप्र मंडळाच्या शाळा-कॉलेजचा रंगारंग कार्यक्रम

गेली १७ वर्ष अविरत सुरु आहे परंपरा

शिस्तबद्ध कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धाडसी खेळ

निलेश जोशी | कुडाळ : कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध प्रशाला आणि महाविद्यालय यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंगतदार झाला. कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या शिस्तबद्ध आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सकाळी बरोब्बर ७ वाजून ५५ मिनिटांनी कामशिप्र मंडळाचे पदाधिकारी गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कुडाळ हायस्कुलच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीताची धून वाजवली. त्यांनतर महाराष्ट्र गीत सादर झालं. यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय एनसीसी सिनियर डिव्हिजन, कुडाळ हायस्कुल एनसीसी ज्युनियर डिव्हिजन, इंग्रजी माध्यम शाळा, कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेज, स्काऊट आणि गाईड अशा पथकांनी शानदार संचालन करून प्रमुख अतिथी गजानन कांदळगाकार यांनी सलामी दिली. त्या अगोदर गजानन कांदळगावकर यांनी सासर्व संचालन पथकांची पाहणी केली.

यावेळी उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून कुडाळ हायस्कुलचे सुधांशु महेश धुरी, जेबा जावेद पटेल तसंच संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे अंकुश विजय धुरी आणि सी सायली एकनाथ परब यांचा गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गजानन कांदळगावकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना या दिवसाचे महत्व विशद केलं. यांनतर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेचा फ्लॉवर डान्स, कुडाळ हायस्कुल उच्च माध्यमिक, कुडाळ हायस्कुल माध्यमिक विभाग, यांनी विविध नृत्य सादर केली. एसआरएम कॉलेज सांस्कृतिक विभागाच्या वतीने वैष्णवी धामापूरकर हिने भरतनाट्यम तर इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ आणि जोगवा हि लोकनृत्य सादर केली. त्यांनतर संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

कमशिप्र मंडळाचा हा उपक्रम २००९ मध्ये सुरु झाला. यंदाचा हा १७ व कार्यक्रम होता. असे कार्यक्रम विविध शाळांमधूनसुद्धा व्हावेत अशी अपेक्षा कमशिप्र मंडळाचे जनरल सेक्रेटरी अनंत वैद्य यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे हिंदीतून बहारदार सूत्रसंचालन कॅप्टन आवटे यांनी, इंग्रजीतून सौ. जोशी मॅडम आणि मराठीतून प्रा. संतोष वालावलकर यांनी केलं. यावेळी कमशिप्र मंडळाचे अरविंद शिरसाट, अनंत वैद्य, का. आ. सामंत, सुरेश चव्हाण, महेंद्र गवस, कुडाळ हायस्कुलचे मुख्याध्यापक महेश ठाकूर, एसआरएम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा कामत, केदार सामंत, अनंत जामसंडेकर, भूषण तेजम, डॉ. सवदत्ती, धीरज परब, अभय शिरसाट, शिवप्रसाद राणे, एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईड विभागाचे प्रमुख, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, शाळा, कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षेकेतर कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

rapan bottom