मिली मिश्रा | कुडाळ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा नेरुर, पंचशील नगर, पंचशील मंडळ नेरुर, समता नगर, आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात संविधान चित्ररथ रॅली कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा यांच्या सहकार्याने निघाली. रॅली ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा पासून सुरुवात होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुडाळ येथ पर्यंत होती. या रॅलीमध्ये ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा, विद्यमान सरपंच , उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, संविधान सन्मान कार्यकर्ते, नियोजन समिती नेरुर , सर्व माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व माजी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, सर्व सीआरपी ताई , आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समिती आशा स्वयंसेविका, प्रभाग संघ प्रमुख, सर्व महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. संविधानाचे महत्त्व सर्व स्तरापर्यंत पोहोचावे या साठी या रॅली चे आयोजन केले होते असे आयोजकांनी सांगितले. रॅली मध्ये ३ चित्ररथ लक्ष वेधून घेत होते.


पहिल्या चित्ररथामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे दृश्य , दुसऱ्या चित्र रथामध्ये डॉ. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये रुपयाचे महत्त्व पटवून देऊन खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरतेची सुरुवात केली हे सांगणारे दृष आणि संविधानाची प्रतिकृती आणि तिसऱ्या आणि शेवटच्या दृषामध्ये असे सर्व मिळून भारत देश तयार होतो हे सांगण्यासाठी भारत देशाची प्रतिकृती असे दृश्य तयार केले होते. रॅली चे उद्घाटन नेरूर येथे विद्यमान सरपंच मा. भक्ती घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. रॅली कुडाळ ला आल्यानंतर कुडाळ नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. प्राजक्ता शिरवलकर यांनीही उपस्थिती दर्शवून प्रजासत्ताक दिनाच्या व संविधान अमृत दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.




