Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

पालकमंत्र्यांनी तात्काळ घेतली बैठक

४ हजार ५८० शेतकऱ्यांना लाभ

१० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई

सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील ६ मंडळातील ४ हजार ५८० बागायदार शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी फळपिक विमा भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विमा कंपनीला दिले. संबंधित कंपनीनेही पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये १५ फेब्रुवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत फळपिक विमा भरपाई रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मान्य केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी पिक विमा योजनेसंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री खुरकुटे, रिलायन्स इंनशुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सिध्देश येडवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आमचे सरकार शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे. जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये जानेवारी ते म दरम्यान अवकाळी पाऊस,अती तापमान तसेच फळमाशांचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. वर्षभरापासून शेतकऱ्यांना फळपिक विम्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांनी दिलेली नव्हती. विमा कंपन्यांकडून आता जिल्ह्यातील २ हजार ९५५ आंबा बागायतदारांना ९ कोटी ९ लाख ९७ हजार रूपये आणि १ हजार ६२५ काजू उत्पादक शेतकऱ्यांना ८ कोटी ५२ लाख ४९ हजार रूपये असे एकूण ४ हजार ५८० शेतकऱ्यांना १० कोटी ६२ लाख ४६ हजार रुपये विमा भरपाई मिळणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वर्ष उलटून गेले तरीही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही विमापरतावा जमा झाला नाही. याबाबत आंबा बागायतदार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कृषी विभागाने वारंवार संबंधित विमा कंपनीशी पत्रव्यवहार करुनही विमा कंपनीने याची दखल घेतली नव्हती. परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला दिले.प्रलंबित राहिलेल्या महसूल मंडळांचा तपशिल प्रमाणे आहे.

rapan bottom