Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मतदार नोंदणी करून मतदानाचा अधिकार बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य!

मतदार नोंदणी करून मतदानाचा अधिकार बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य!

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील

मालवण येथे राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम संपन्न

मालवण | प्रतिनिधी : देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हाती आहे. 18 वर्षे पुर्ण झालेल्या युवकांनी स्वतःची मतदार नोंदणी करून घेणे ही जबाबदारी आहे. मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी येथे बोलताना केले.जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अनिल पाटील हे बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संतोष लुडबे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील व सामाजिक कार्यकर्ते संतोष लुडबे यांचा सत्कार करण्यात आला. तर मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनाकडून मालवण तालुक्यातील विविध महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंद करणारा भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रांगोळीकर पार्थ मेस्त्री याचा सत्कार करण्यात आला. तर लाकडापासून वाहनांच्या प्रतिकृती बनविणारा वायरी येथील गीतेश मेस्त्री याने आपल्या वस्तूंचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्या समोर केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी मतदार नोंदणी बाबत मार्गदर्शन करत मतदार नोंदणी करून घेणे आवश्यक असून मतदार नोंदणी विषयक विविध अर्जांची माहिती घ्यावी. युवक सक्षम झाल्यास लोकशाही सक्षम होईल, असे सांगितले.तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी विचार मांडत मतदानाच्या अधिकाराचे महत्व काय असते हे आजपर्यंत देशातील जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने ग्राम स्तरावरही मतदार नोंदणीच्या सुविधा उपलब्ध केल्या असून त्याद्वारे मतदार नोंदणी करण्यात यावी असे सांगितले. यावेळी संतोष लुडबे यांनी या कार्यक्रमासं शुभेच्छां दिल्या. आभार नायब तहसीलदार प्रिया शेवाळे यांनी मानले.

यावेळी निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. देविदास हारगिले, मातृत्व आधार फाउंडेशनचे सचिव दादा वेंगुर्लेकर यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग, महसूल व निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व प्राध्यापक आदी उपस्थित होते.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मालवण येथे आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

rapan bottom