Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

उत्पन्न वाढीसाठी मोहोर संरक्षण महत्त्वाचे : गोपाळ गोळवणकर

उत्पन्न वाढीसाठी मोहोर संरक्षण महत्त्वाचे : गोपाळ गोळवणकर

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील असरोंडी येथे श्री.संदीप परब यांच्या काजू बागे मध्ये तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व आत्मा यांच्या सहयोगाने आंबा काजू मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे शास्त्रज्ञ श्री. गोपाळ गोळवणकर , मंडळ कृषी अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण , सरपंच श्री अनंत पोईपकर , उपसरपंच श्री. बाळकृष्ण सावंत , कृषी पर्यवेक्षक श्री. डी. के. सावंत , सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री. एन. एम. गोसावी , कृषि सहाय्यक श्री. नितेश पाताडे व मोठ्या संख्येने आंबा काजु बागधारक शेतकरी उपस्थित होते .

या कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ श्री. गोळवणकर यांनी आंबा व काजु फळ झाडांच्या मोहोराचे योग्य संरक्षण व रोग किडींचे योग्य व्यवस्थापन कसे करावे या बद्दल तसेच आताच्या सिंधुदुर्गातील वातावरणानुसार आंबा व काजू मोहोराचे योग्य रीतीने संरक्षण कसे करता येईल यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले . सदरील कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. या सर्व कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत उपसरपंच श्री.सावंत यांनी मांडले . सदरील कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कृषि पर्यवेक्षक श्री. सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्री. नितेश पाताडे यांनी केले.

rapan bottom