काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भाऊ भोगले | बागायत : वडाचापाट येथील गिरावळ माळावर भर दुपारी अज्ञाताने आग लावल्याने स्थानिक ग्रामस्थांची बागायतदारांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली .बरेच जण कामधंद्यासाठी बाहेर गेले असल्याने आगीची बातमी समजताच आजूबाजूची लोकांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र जोराच्या हवेमुळे आग वीजवताना मोठ्या प्रमाणात दमछाक झाली . वडाचापाट येथील स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही आग पोईप धरण क्षेत्रातून आल्याचे दिसून येते. गुरांच्या सुक्या चाऱ्याचा तसेच काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले .

