Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी २ फेब्रुवारी पासून

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी २ फेब्रुवारी पासून

आचरा : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची पूर्व परंपरेनुसार चालत आलेली डाळपस्वारीची रविवार २ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ती संपन्न होणार आहे. मालवण तालुक्यातील जागृत आणि प्राचीन शिवस्थानामुळे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. येथील सण उत्सव संस्थानी थाटात साजरे होत असतात.

अशाच प्रकारे दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी या वर्षी श्रींच्या कौल प्रसादाने रविवार २ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. रविवार २ फेब्रुवारीला सकाळी रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी डाळपस्वारीला बाहेर पडणार आहे. आचरा बाजारपेठ फुरसाई मंदिर येथील डाळप करून मिराशीवाडी ब्राम्हणदेव येथे भेट दिल्यानंतर सायंकाळी नागझरी गिरावळ मंदिर (पूर्वी आकारी) येथे विसावणार आहे.

सोमवारी 3 फेब्रुवारी ला गिरावळ मंदिर येथे मुक्काम केला जाणार असून मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर डाळप आटोपून भंडारवाडी, बौद्धवाडी स्थळ येथील डाळप करुन सायंकाळी उशिरापर्यंत गाऊडवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे विश्रांती साठी थांबणार आहेत. रात्रीच्या विश्रांती नंतर बुधवार रोजी श्री ब्राम्हणदेव मंदिर येथून पांगेवाडी मंडप गाउडवाडी, जामडूल, पिरावाडी चव्हाटा मार्गे हिर्लेवाडी ब्राम्हणदेव मंदिरास भेट देऊन पहाटे पुन्हा गिरावळ मंदिराकडे येणार आहेत.

गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी गिरावळ मंदिराकडे विश्रांती नंतर शुक्रवारी आचरा बाजारपेठ मार्गे नागोचीवाडी ब्राम्हणदेव, पारवाडी ब्राम्हणदेव मंदिराकडील डाळप करून रामेश्वर भेटीनंतर पहाटे पर्यंत देवूळवाडी गांगेश्वर मंदिरा कडे स्थिरावणार आहे

rapan bottom