मिली मिश्रा | कुडाळ : यंदाचा स्वामी समर्थ तालुका दर्शन सोहळा गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी पार पडणार आहे.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची पालखी गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी कुडाळ येथे अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे आगमन गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी कुडाळ शहरात होणार आहे.
गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी १०: ०० वा श्री स्वामी समर्थ मंदिर औदुंबर प्लाझा ते गुलमोहर हॉटेल पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दुपारी १२:०० वा पावशी येथील श्री विनायक वामन केसरकर यांच्या || श्री स्वामी समर्थ || या निवासस्थानी पालखीचे व पादुकांचे दर्शन आणि महाप्रसाद होणार आहे. पालखी सायंकाळी ४:०० वा पुढील प्रस्थानास निघेल. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे निमंत्रण पर आवाहन श्री. विनायक वामन केसरकर यांनी भाविकांना केले आहे.

