नांदोस कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार
पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : नांदोस कट्टा पंचक्रोशी सुपुत्र महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभाग मंत्री आशिष शेलार यांचा नागरी सत्कार नांदोस कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी नांदोस गावातील जुन्या आठवणीना उजाळा दिला. नांदोस हा माझ्या आईचा गाव असल्याने हा सत्कार अनन्यसाधारण असाच आईच्या मायेचा हात फिरावा असा असल्याची भावना त्यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे माझे विशेष लक्ष राहिलच मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेशी अनेक वर्षांपासून नाळ जुळलेले जेष्ठ नेते खा. नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खरे पालक आहेत. आताही मंत्री नितेश राणे यांच्या रूपाने मंत्रीमंडळात सिंधुदुर्गला योग्य स्थान भाजपा महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, श्रीकृष्ण हरचांदे, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, मामा माडये, काका सरमळकर, भाजपा कोकण संघटक शैलेंद्र दळवी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच आबा कामतेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, खरारे पेंडूर सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, तिरवडे सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, सतीश वाईरकर, प्रसाद मोरजकर, जगदीश चव्हाण यांसह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्री आशिष शेलार यांचे मामा श्रीकृष्ण हरचांदे यांनी केले. सिंधुदुर्ग भाजपा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार केला. कोकणवार विशेष लक्ष यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, मंत्री आशिष शेलार हे नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिले. कोकणवार त्यांचे लक्ष नेहमीच राहिले. कोकण विकासाच्या अनेक संकल्पना ते नेहमीच मांडत असतात. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.भजन क्षेत्राला राजश्रय मिळवून देतील पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतिक विभागही आहे. यां माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलावंत तसेच एकूणच भजन क्षेत्राला राजश्रय मिळवून देण्यात मंत्री आशिष शेलार यांची भुमिका महत्वपूर्ण ठरेलं. असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मुंबई पालिकेतून ठाकरेंचे दुकान बंद होईल : मंत्री नितेश राणे
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत. यां निवडणुकीत ठाकरेंचे दुकान बंद होईल. मुंबईचा महापौर भगवाधारी हिंदुत्ववादि विचारांचा भाजपा महायुतीचा बसेल. मुंबईकर जनता व कोकणी माणूस यांचीही साथ यां विजयात असेल असाही विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

