Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्राजक्ता बांदेकर यांच्या विजया नंतर शिवसेनेचा कुडाळात जल्लोष

प्राजक्ता बांदेकर यांच्या विजया नंतर शिवसेनेचा कुडाळात जल्लोष

घोषणा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणला

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता बांदेकर यांची निवड जाहीर होताच शिवसेना आणि महायुतीच्या गोटात जोरदार जल्लोष व्यक्त करण्यात आला. आमदार निलेश राणे यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणांनी कुडाळ गांधी चौक परिसर दणाणून गेला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात करण्यात आली.


कुडाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कुडाळ पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नगर पंचायत परिसरात मनाई आदेश होता. गांधीचौकातून बाजारपेठेत येताना बॅरिकेट्स लावण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना आणि महायुतीचे सर्व सर्व कार्यकर्ते गांधीचौकात गोळा झाले होते. प्राजक्ता बांदेकर यांची निवड जाहीर होताच एकच जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिश बाजी करण्यात आली खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांची मोठी पोस्टर्स घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


प्राजक्ता बांदेकर सुद्धा निवडून आल्यावर नगरपंचायत कार्यालयातून बाहेर पडून त्या काही अंतरावर गांधी चौकात थांबलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालत गेल्या. त्यावेळी वाटेत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राजक्ता बांदेकर कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोहोचताच पुन्हा एकदा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार निलेश राणेंचे देखील आगमन झाले. शिवसेना झिंदाबाद, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, निलेश राणे तुम आज बढो या घोषणांनी आणि फटाक्यांच्या अतिशबाजीने आसमंत दणाणून गेला. आमदार निलेश राणे यांनी देखील माध्यमांना सामोरे जाताना पारदर्शक कारभाराची अपेक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्याकडून व्यक्त केली.


यावेळी सिद्धिविनायक पॅनलचे सर्व नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे संजय आंग्रे,, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर आदीनी प्राजक्ता बांदेकर यांचे अभिनंदन केले.

rapan bottom