संजय माने | पोईप : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोईप ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे पोईप शाखाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “परत या परत या, बाळासाहेब परत या”, “जय शिवाजी, जय भवानी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणा देण्यात आल्या. सुरुवातीला शाखाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक हस्ते शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या जयंती उत्सवासाठी पोईप शाखाप्रमुख नारायण राणे,बुथप्रमुख बाबाजी नाईक, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पालव, सुधाकर पोईपकर, श्रीधर पालव,भिवा पारकर, समिर परब, प्राजक्ता आंगणे,राजू आंगणे, आदी उपस्थित होते.

