Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वडाचापाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय उपक्रम

वडाचापाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय उपक्रम

गरजू व्यक्तींच्या घरी जाऊन केली मोफत रक्तदाब तपासणी

भाऊ भोगले | बागायत: श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे गेली अनेक वर्ष व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शिकवला जातो हा विषय NSQF (नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेम वर्क) अंतर्गत MSFC (मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स ) विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावी या वर्गांसाठी ऐच्छिक विषय असून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत शंभर गुण असतात. यामध्ये प्रामुख्याने चार विभाग आहेत . त्यातील वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता या विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी पंचक्रोशीतील गरीब गरजू व्यक्तींची माहिती घेऊन अभ्यासक्रमा अंतर्गत रक्तदाब तपासणी करण्याचे ठरवून वडाचापाट ,गोळवण, चाफेखोल, मसदे, आंगणेवाडी येथील गरजू व्यक्तींच्या घरी जाऊन रक्तदाब तपासण्याचे फायदे व त्यावर उपाय सांगून मोफत रक्तदाब तपासून दिला.


यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची स्तुती केली. या उपक्रमामुळे साध्या सोप्या रक्तदाब तपासणी साठीही तासनतास दवाखान्यात रांगेत राहावं लागतं त्याऐवजी गावातील विद्यार्थ्यांना या विषयाचे प्रशिक्षण मिळाल्याने भविष्यात घरबसल्या विद्यार्थ्यांचा व्यवसाय होऊ शकतो तर गरीब गरजू , अपंग व्यक्तींना त्याचा लाभ मिळू शकतो .या विषयाच्या निदेशिका हर्षदा पाटकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

rapan bottom