Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरास उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरास उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.या रक्तदान शिबिरात ४५ रक्दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी मा. आ. वैभव नाईक म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी ८० समाजकारणाची आणि २० टक्के राजकारणाची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यांच्या शिकवणीनुसार काम करून रक्तदान शिबीर घेऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी आपण जोपासली आहे. समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. अशा सामाजिक कार्यातूनच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. गर्व से कहो हम हिंदू है! ही घोषणा सर्वप्रथम बाळासाहेबांनी दिली. बाळासाहेब यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. त्यामुळे बाळासाहेबांना अभिप्रेत असे काम आपण केले पाहिजे. शिवसेनेच्या हिंदुत्वाचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असे मार्गदर्शन वैभव नाईक यांनी केले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शिवसेना प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महेश जावकर, गणेश कुडाळकर, महिला तालुकाप्रमुख दिपा शिंदे, कुडाळ विधानसभा युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, अमित भोगले,भाई कासवकर, नंदू गवंडी, राजू नाडकर्णी, किशोर गावकर, किरण वाळके, हेमंत मोंडकर, भगवान लुडबे, प्रसाद चव्हाण, सुरेश मडये,उमेश मांजरेकर, रूपा कुडाळकर, पायल आढाव, विद्या फर्नांडिस, राहुल सावंत, साई वाघ, ऐवान फर्नांडिस, सिद्धेश मांजरेकर, रश्मी परुळेकर, सोनाली डीचवलकर, साहिल कासले, करण खडपे, झोया खान, आनंद चिरमुले, जिल्हा रुग्णालय ओरोसचे डॉ. संकेत रोटे, प्रांजली परब, विशाल जाधव, नेहा परब, ऋतुजा हरमळकर, नंदकिशोर आडकर, नितीन गावकर यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom