माजी सभापती सुनील घाडीगावकर व शिरवंडे ग्रामपंचायतचे आमदार निलेश राणे यांना निवेदन
मालवण : शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूर व्हावे अन्यथा असरोंडी सजा जोडून मिळावी अशी मागणी माजी सभापती सुनील घाडीगावकर तसेच शिरवंडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांना करण्यात आले आहे.
शिरवंडे गाव हा डोंगरी भागात येत असून पूर्वी तलाठी ऑफिस असरोंडी, शिरवंडे व किर्लोस या तीन गावाचं असरोंडीला होते. परंतु माजी आमदार वैभव नाईक यांनी ती असरोंडी सझा फोडून किर्लोस व शिरवंडे असे दोन गावांची सझा त्यांच्या किर्लोस मधील कार्यकर्त्यांच्या मागणी मुळे किर्लोसला केले. असरोंडी व शिरवंडे दोन गावांमधील अंतर 2 किलोमीटरचे होते व आता किर्लोस व शिरवंडे अंतर सात ते आठ किलोमीटर आहे. शिरवंडेतील लोकांना किर्लोस या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची सोय नसल्यामुळे तेथे जाणे गैरसोयीचे झाले आहे.
शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल या दोन गावांपेक्षा जास्त आहे. असरोंडी गावाचे महसूल उत्पन्न 8288 रुपये आहे. किर्लोस गावचे महसूल उत्पन्न 8294 रुपये आहे, व शिरवंडे गावचे महसूल उत्पन्न 27 हजार 972 एवढे आहे. नियमानुसार शिरवंडे गाव महसूल सझे साठी पात्र ठरतो, परंतु वैभव नाईक यांनी सुडाच राजकारण करून चुकीच्या पद्धतीने शिरवंडे गाव तलाठी सजेसाठी किर्लोसला जोडून शिरवंडे गावावर अन्याय केला आहे, तरी शिरवंडे गावामध्ये नवीन तलाठी ऑफिस मंजूर करावे, तसे होत नसल्यास पूर्वीप्रमाणे असरोंडी तलाठी सझेला शिरवंडे गाव जोडावा व शिरवंडे गावातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी.
माजी पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या सभेमध्ये तलाठी ऑफिस संदर्भात विषय शिरवंडे गावामध्ये होण्याबाबत विषय मांडला होता, व त्याचा ठराव ही सादर केला होता, परंतु वैभव नाईक यांच्या गलिच्छ राजकारणामुळे त्याचा उपयोग झाला. नाही तरी मेहरबानी करून वरील विषयाचा विचार करून योग्य तो न्याय मिळावा. अशी मागणी शिरवंडे ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांना करण्यात आली आहे.

