श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून, श्री रेकोबा मित्र मंडळ व माघी गणेश उत्सव मंडळ यांचे आयोजन
मालवण : माघी गणेश जयंती निमित्त मा. श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंती उत्सव 2025 चे आयोजन सिद्धिविनायक पटांगण, शासकीय तंत्रनिकेतन शेजारी, कुंभारमाठ येथे करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे 15 वे वर्ष आहे.
शुक्रवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी संपन्न झाल्यावर सायंकाळी 4 वाजता गणेश आगमन सोहळा होणार आहे.
शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गणेश मूर्ती पूजन होणार आहे. दुपारी 12: 30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती झाल्यानंतर सायं. 7:30 वाजता संगीत भजन होणार आहेत. रात्रौ 9 वाजता स्वयंभू प्रा. भजन मंडळ पियाली, कणकवली बुवा श्री संतोष कानडे व श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, कणकवली बुवा श्री प्रकाश पारकर यांचा जंगी भजनबारी सामना होणार आहे.
रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती होईल, त्यानंतर दुपारी 12:30 वाजता प्रसाद, सायंकाळी 7 वाजता महाआरती झाल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता संगीत भजन होणार आहे. रात्रौ ठीक 9 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा 'गोरक्षनाथ जन्म अर्थात भक्तीतेज' हा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.

सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती, दुपारी 12: 30 वाजता महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाआरती व त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता संगीत भजन होणार आहे. रात्रौ ठीक 9 वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली यांचा 'कृष्ण भक्त कुंम्भनदास' हा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.
मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती झाल्यानंतर सकाळी 9:30 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाआरती व सायंकाळी 7:30 वाजता संगीत भजन होणार आहे. रात्रौ ठीक 9 वाजता कै. बाबू लूडबे यांच्या स्मरणार्थ भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती झाल्यानंतर सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची पूजा व तीर्थप्रसाद होणार आहे. त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी 7 वाजता महाआरती व सायंकाळी 7:30 वाजता संगीत भजन होणार आहे. रात्रौ ठीक 9 वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा 'कुमारी झाली आई, हरिहर भेटीची नवलाई' हा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.
गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती, दुपारी 12:30 वाजता प्रसाद, सायंकाळी 4:30 वाजता हळदीकुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती झाल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता संगीत भजन व रात्रौ ठीक 9 वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा 'पतिव्रत्यतेज अर्थात महिमा शिवचक्र तिर्थाचा' हा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.
शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाआरती व त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 4 वाजता श्री गणेश विसर्जन मिरवणूक होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी दर्शन घेऊन या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रेकोबा मित्र मंडळ व माघी गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे

