Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक

तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरून चिपी मुंबई विमान सेवा बंद असून इतर ठिकाणी सुरु असलेली विमानसेवा देखील नियमित सुरु नाही त्यामुळे चिपी विमानतळ बंद होण्याच्या स्थितीत आहे. सत्ताधारी नेते चिपी विमानतळाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी विमानसेवेत सुधारणा न झाल्यास चिपी विमानतळावर आंदोलन करून कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे चिपी विमानतळ चालविणाऱ्या आयआरबी कंपनीचे संचालक किरणकुमार, व्यवस्थापक कुलदीप सिंग, टर्मिनल व्यवस्थापक श्री राव यांच्यासमवेत शिवसेना नेते आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची बैठक झाली.


या बैठीकीत आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नव्याने यंत्रणा उभारून नाईट लँडिंग विमान सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. चिपी विमानतळावर जास्तीत जास्त विमाने उतरवून प्रवाशांना सुरळीत सेवा देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांच्या समक्ष आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी यांनी दिली. त्यासाठी काही तांत्रिक परवानग्या आवश्यक असून त्या परवानग्या मिळाव्यात अशी मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. शिवसेना नेत्यांनी देखील त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.

rapan bottom