भाऊ भोगले | बागायत : मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध पेंडूर गावच्या श्री देवी जुगाईचा मांड उत्सव दिनांक 10 जानेवारी पासून सुरू झाला आहे हा उत्सव एक वर्ष आड करून येतो. आणि यामुळे या उत्सवाला फार मोठी गर्दी पाहायला मिळते हा उत्सव 14 दिवसांचा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तर महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक भक्त या उत्सवाला येतात . हा उत्सव श्री देव वेताळ मंदिरात भक्तीमय वातावरणात सुरू आहे. भावी भक्त श्री देव वेताळ श्री देवी सातेरी श्रीदेवी जुगाईची खणा नारळानी केळ्यांचा पेढ्यांचा प्रसाद ठेवून मनोभावे ओटी भरणे नवस करणे नवस फेडणे सुरू आहे.

मांड उत्सवाचे शेवटचे दोन दिवस राहिल असल्याने भाविक भक्तांची पेंडूर गावात मोठ्या संख्येने ये जा सुरू आहे त्यातच देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध गावातून भजन मंडळाचे सुस्राव्य भजनांचा कार्यक्रम रोजच सुरू आहे
या कार्यक्रमासाठी विविध मंत्र्यांनी,विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांची, सेलिब्रिटींची तसेच विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तीनी, शासकीय अधिकारी उद्योगपती यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने विविध व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामध्ये हॉटेल व्यवसायिक तसेच ओट्या विक्रेत्यांचा फार मोठा व्यवसाय होताना दिसत आहे.या उत्सवाच्या निमित्ताने करोडोंची उलाढाल होत असते.

या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे येथील नारळ, केळी, खण,आणि साड्यांचे जमा झालेले उंचच उंच ढीग सर्वांचे लक्ष वेधून घेतात ,येथील मानकरी शिस्त बध्द मांडणी करून ठेवतात.

या उत्सवात मंदिर ट्रस्टने भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य काळजी घेत गाड्यांची पार्किंग व्यवस्था तसेच झटपट भाविकांना दर्शन मिळण्यासाठी योग्य लाईनची व्यवस्था तसेच मोठ्या भरण्यासाठी त्या ठिकाणी देवाकडे गाऱ्हाणे करण्यासाठी जास्तीत जास्त माणूस नाही म्हणून भाविक भक्तांना लवकरात लवकर दर्शन मिळवून देण्याची व्यवस्था केलेली आहे.


