आचरा : कालावल खाडीपात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. सोमवारी आंदोलकांच्या मागणीनुसार बी 3 वाळू पटट्याचे सीमांकन निश्चित करण्यासाठी सकाळी बंदर विभाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर सीमांकन निश्चितीचे काम हाती घेतले. यावेळी आंदोलनकर्ते ग्रामस्थ व वाळू व्यावसायिक मोठ्या संख्येने हजर होते सीमांकन निश्चितीचे काम झाल्यानंतर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थ म्हणाले प्रशासनाकडे वारंवार विनंती करत आहोत. तरीही उत्खनन रोखले जात नसेल तर आमचे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा निर्धार कायम ठेवला.
सोमवारी सकाळी तोंडवळी येथे मालवण बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, महाराष्ट्र सागरी मंडळचे सर्व्हेअर डी. एस. कानडे हे तोंडवळी येथील खाडीत जिपीस द्वारे b3 गटाचे सीमांकन करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी यांसह बंदर विभाग टीम, ग्रामस्थ, टेंडर धारक यांना एकत्रित घेत वाळू टेंडर भागाचे सीमांकन निश्चित केले.
सीमांकन झाल्यानंतर बंदर विभाग टीम ही ग्रामस्थ आंदोलन स्थळी असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी हजर झाली असता ग्रामस्थांना सीमांकानाची माहिती दिली व वाळू टेंडर धरकांना व उपस्थित ग्रामस्थ यांना सीमा दाखवल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आम्हला नुसते सीमांकन नको या वाळू उपशामुळे आमच्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. नुसते सीमांकन करून आमची असलेली मागणी पूर्ण झालेली नाही आपण वाळू उपसा बंद करावा अशी मागणी लावून धरली. यावेळी सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी म्हणाले आमचे काम सीमांकन करणे होते पुढील निर्णय जिल्हाधिकारी घेतील. आंदोलना दरम्यान ग्रामस्थांची मागणी होती की वाळू सीमांकन झालेले आहे ते आपणास माहित नाही ते सीमांकन पुन्हा ग्रामस्थांच्या समक्ष करावे अशी होती आपल्या मागणीनुसार बंदर विभागाने आपल्या मागणीनुसार पुन्हा सीमांकन केलेले आहे. त्यानुसार टेंडर धारकांनी वाळू उपसा कुठे करायचा हे निश्चित केलेले आहे टेंडर कुठे लावावे किंवा रद्द करावे हे अधिकार आपले नसून जिल्हाधिकारी यांचे असल्याचे यावेळी बंदर अधिकारी म्हणाले.
ग्रामस्थांनी यावेळी वाळू उपशाला विरोध दर्शवत वाळू उपसा होत असलेल्या भागात किनाऱ्या लगत लोकांची घरे आहेत पूर्वी या भागात टेंडर लागले नसताना इथे टेंडर लावले गेले आज या घरांना धोका झाला आहे. असे असताना वाळू टेंडर कसे लावले गेले असा सवाल केला.
यावेळी मोठया संख्येने वाळू व्यावसायिक आले होते. बंदर अधिकारी यांच्यासमोरच आंदोलनकर्ते ग्रामस्थ आणि वाळू व्यावसायिक यांच्यात शाब्दिक चकमंक उडाल्या. यावेळी मालवण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. यावेळी ग्रामस्थांनी वाळू उपशाला आमचा विरोध कायम असून जर प्रशासन यांची दखल घेत नसतील तर आंदोलनाचे स्वरूप आम्ही तीव्र करणार असून याचं नेतृत्व तोंडवळी सरपंच करतील. या दरम्यान होणाऱ्या परिणामास प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
समोपचाराने प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तयार होतो : वाळू व्यसायिक
यावेळी वाळू व्यावसायिक व तोंडवळी ग्रामस्थ गणेश तोंडवळकर यांनी आपण गावाच्या हिताच्या विरोधात कधीही काम केली नाही. त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी आम्ही वाळू व्यावसायिक प्रयत्नशील होतो पण सहकार्य मिळाले नाही. शासनाच्या आदेशाचा मान राखत जल आलेखन होईपर्यंत आम्ही तोंडवळीतील वाळू व्यावसायिकांनी वाळू उपसा पुर्णतः बंद ठेवला होता. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच आम्ही वाळू उत्खनन करत आहोत. परंतु या नियोजित ठिकाणी सहा वाजता पोहोचण्यासाठी आमच्या होड्या पाच वाजता पाण्यात ढकलाव्या लागतात. आम्ही परवाना घेऊन नियम पाळून व्यवसाय करणार. मात्र मागिल काही वर्षे वाळू उत्खनन सुरू होते. आता शासनाने पैसे भरून परवाने दिल्या नंतर आंदोलन होतात. मात्र आम्ही कोणाला दोष देणार नाही आमची भुमिका शांततेची राहील असे वाळू व्यावसायिक म्हणाले.

कालावल खाडीपात्रात बी ३ वाळू उपसा क्षेत्राचे पुन्हा सीमांकन
