Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

नियमात राहूनच वाळू उपासा

नियमात राहूनच वाळू उपासा

आमच्याकडून अनधिकृत वाळू उत्खनन होत नाही

तोंडवळी, हडी येथील परवानाधारक वाळू व्यावसायिकांनी मांडली भुमिका

मालवण | प्रतिनिधी : शासनाला अधिकृतपणे महसूल रक्कम भरणा केल्यानंतरच आम्हाला वाळू उपसा करण्यास परवानगी व जागा निश्चीत करून देण्यात आलेली आहे. महसूल भरणा करून शासनाने वाळू उपसा परवाने दिले आहेत. आमच्याकडून अनधिकृत वाळू उत्खनन होत नाही. यापुढेही नियमात राहूनच वाळू उपासा करणार. आमची भुमिका शांततेची व सनदशीर मार्गाची आहे. असे तोंडवळी, हडी येथील वाळू व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून ठरवून दिलेल्या जागेत आणि ठरवून दिलेला वाळू कोटा आम्ही सनदशिरमार्गाने काढत होतो आणि यापुढेही शांततेच्या मार्गाने राहू. असे असताना तोंडवळी गावातील काही उबाठाच्या मंडळींनी गावातील ग्रामस्थांना चुकीची माहिती देत वातावरण विघडविण्याचे काम केले आहे. या विषयात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थ व आम्ही एकाच गावातील आहोत. वाळू उपसा झाला नाही तर पुराचा धोका वाढणे यांसह अन्य बाबींचा विचार करून प्रशासनाकडून आम्हाला अधिकृतपणे परवानगी देण्यात आलेली आहे, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काहीही करणार नाही. असेही तोंडवळी, हडी येथील वाळू व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मालवण येथील कान्हा रसोयी याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत वाळू व्यावसायिक बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाने निश्चीत केलेले टेंडर, अधिकृतपणे महसूल भरल्यानंतर घेण्यात आलेले टेंडर याची सविस्तर माहिती दिली. यावेळी गणेश तोंडवळकर, राजेश शेडगे, मालोजी हडकर, अरूण खोत, प्रशांत मिसळे, राहुल मिसळे, ऋषी आसोलकर तसेच इतर वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

आम्ही आणि आंदोलनकर्ते ग्रामस्थ एकाच गावातील आहोत. आम्ही अधिकृतपणे व्यवसाय करत असताना आम्हाला त्रास देण्यासाठी उबाठाची मंडळी प - यत्नात आहेत. आम्ही ग्रामस्वांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही वाळू काढणार आहोत, मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रातील बी ३ यां गटातील गाळस दृश्य वाळूचे उतखनन करण्यासाठी आम्हाला प्रशासनाने परवानगी दिली. सर्व कागदपत्रे व लाखो रुपये महसूल रक्कम भरणा केल्या नंतर आम्हाला परवाना देण्यात आला. मात्र यां दरम्यान खाडी पात्रात ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यामुळे मालवण तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला १६ ते १९ जानेवारी या चार दिवस वाळू उपसा करू नये असे सांगितले. आमचे नुकसान सहन करून आम्ही आदेशाचे पालन केले.

आम्ही सर्व स्थानिक असून या व्यवसायात अनेक वर्षे असून शासनाच्या नियम अटी तसेच परवाना घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो. अनेक कुटुंब यां व्यवसायावर अवलंबून आहेत, असेही वाळू व्यावसायिकांनी सांगितले.

आमचे नुकसान करू नका

शासनाने ज्या क्षेत्रात वाळू उपसा सांगितला त्या क्षेत्राची आज ग्रामस्थ व आमच्या उपस्थित अधिकारी यांनी हद्द निश्चित केली. तरी आम्हाला दिलेल्या परवाना नुसार वाळू उतखनन करण्यास मिळावे. सर्वा समोर खाडीतील हद्दनिश्चित झाली. ग्रामस्थ यांच्या काही मागण्या आहे. त्यातील सकारात्मक योग्य बाबींचा प्रशासनाने निश्चित सकारत्मक विचार करावा, आम्हीही आमच्या वतीने सहकार्य निश्चित करू कारण सगळे ग्रामस्थ आमचेच आहेत. गावे आपली आहेत. त्यामुळे आम्हाला वाद करायचे नाहीत. आमचीही भुमिका शांततेची आहे. प्रशासनाला सहकार्य करायची आहे.

आम्ही ग्रामस्थ यांच्या भूमिकेचा आदर करतो. आम्हाला परवाना मिळाला आहे त्या बी ३ यां क्षेत्रात वाळू उत्खनन करण्यास अटकाव करू नये. आम्ही भरलेले पैसे, देण्यात आलेला परवाना यां सर्वांचा विचार व्हावा. आम्ही व्यावसायिक हे स्थानिक आहोत. अनेक जण एकत्रित येऊन व्यवसाय करतो. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांनी एकत्र येऊन शासनाच्या परवानगीने एकत्रित व्यवसाय करण्याचे यां उद्देशाने पैसे भरले. होड्या, कामगार व अन्य साहित्य आणले. याचा विचार शासनाने करावा, असेही वाळू व्यावसायिक म्हणाले. आमच्या होड्यांचे नांगर कापून टाकण्यात आलेले आहेत. काही वेळा आमच्या कामगारांवर दगड मारण्याचेही प्रकार होत आहेत. तरीही आम्ही शांतपणे आमचा व्यवसाय करत आहोत. यामुळे प्रशासनाने आम्हाला अधिकृतपणे संरक्षण देणे आवश्यक आहे, असेही व्यावसायिक म्हणाले.

फोटो : हडी तोंडवळी येथील परवाना धारक वाळू व्यावसायिक यांनी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली. (अमित खोत, मालवण)

rapan bottom