शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा देवबागमध्ये भाजपा, उबाठाला धक्का
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवबाग गावात ठाकरे शिवसेनेसह भाजपलाही धक्का दिला आहे. येथील उबाठा उपसरपंच ताता बिलये यांच्यासह
भाजप ग्रामपंचायत सदस्य हेमंत बांदेकर, स्वरा तांडेल, माजी पं. स सदस्या मधुरा चोपडेकर, माजी उपसरपंच नादार तुळसकार, मकरंद चोपडेकर, बाबली चोपडेकर, बाबु कासवकर, बुथ अध्यक्ष नितीन बांदेकर, संकेत राऊळ,दिनू कासवकर, गुंडू तांडेल, दाजी कुमठेकर, चैतन्य वालावालकर, भरत राऊळ, दिलीप पेडणेकर, विली ब्रिटो, बाबा कुमठेकर आदी भाजप कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. अशी माहिती मंदार लुडबे यांनी दिली.
यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दिपक पाटकर, मंदार लुडबे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, दत्ता चोपडेकर, नाना तांडेल, बाळा माने, प्रीतम गावडे, राजू बिडये, जॉन नरोन्हा, सूरज बिरमोळे, तुषार सामंत, जय सामंत उपस्थित होते.

उबाठा उपसरपंचांसह भाजपा ग्रा. पं. सदस्य, माजी पं. स. सदस्य व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
