Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मत्स्य सेनापती मंत्री नितेश राणे यांच्या मस्तकावर पालकमंत्री पदाचा मुकुट

मत्स्य सेनापती मंत्री नितेश राणे यांच्या मस्तकावर पालकमंत्री पदाचा मुकुट

नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि किनारपट्टीला अच्छे दिन येणार

मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मच्छीमार सेल, जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
नितेश मत्स्य व बंदर खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यापासून आपल्या कार्यशैलीची चूणूक दाखवून दिली आहे .अतिशय कमी कालावधीत त्यांनी संबंधित खात्याचे बारकाईने अवलोकन करून संपूर्ण खाते अधिकाधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल आहे. विशेषतः किनारपट्टी भागातील मत्स्य व्यवसायिक ,सागरी पर्यावरण आणि किनारपट्टी भागातील समुदायासंदर्भात असलेले प्रश्न यांची नियोजनबद्ध सोडवणूक करण्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत, असे तोरसकर यांनी म्हटले आहे.

मत्स्यव्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री असल्याने महाराष्ट्राच्या सागरी जलधीक्षेत्र, किनारपट्टी तसेच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय यांचे पालकत्व नाम.नितेश जी यांच्याकडे होतेच. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पदाची धुरा दिल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार पालक म्हणून त्यांच्याकडे आला आहे . नितेश राणे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवण्याची संधी मिळावी ही सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्रातील संपूर्ण किनारपट्टी यांच्या दृष्टिकोनातून दुग्ध शर्करायुक्त योग आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीची सलग तिसरी टर्म असल्यामुळे मंत्रालयीन कारभाराचा अनुभव आहेच. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाज याबाबत ज्येष्ठ भाजपा नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रलंबित गोष्टी यांची सोडवणूक, तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना आणि राबविलेल्या कल्याणकारी योजना या सर्वांचा आदर्श भविष्यात इतर जिल्ह्यांनी घेतला तर नवल नाही.


माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर ,आमदार निलेश राणे ,तसेच कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजप पक्ष आणि महायुतीची भक्कम साथ मिळणार आहे.प्रशासनावरची पकड, संबंधित विषयाचा अभ्यास व राज्य आणि केंद्रातून असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अच्छे दिन येणार एवढं निश्चित आहे असा विश्वास तोरसकर यांनी व्यक्त करत मत्स्य सेनापती नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीबद्दल अभिनंदन मच्छिमार सेल, जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

rapan bottom