मुंबई : महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी ना. नितेश राणे तर रत्नागिरीची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

ना. नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री
