मिली मिश्रा | कुडाळ : सालाबाद प्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग ऑटो रिक्षा युनियन, कुडाळ यातर्फे २६ जानेवारी २०२५ रोजी कोटेश्वर मंदिर एस.टी.स्टॅण्ड समोर , कुडाळ येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १२ वाजता श्री सत्यनारायणाची आरती व दुपारी ३ वाजता सुश्राव्य भजनांचे आयोजन केले आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर , "वेडा चंदन" या नाटकाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी तसेच रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे सिंधुदुर्ग ऑटो रिक्षा युनियन, कुडाळच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग ऑटो रिक्षा युनियन, कुडाळ तर्फे महापूजा तसेच "वेडा चंदन" नाटकाचे आयोजन<br>
