मालवण | प्रतिनिधी : मालवण पत्रकार समिती आयोजित इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा (2024) स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ज्येष्ठ पत्रकार मालवण तालुका पत्रकार समिती माजी अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक मिळविलेले केशव उर्फ भाऊ भोगले व तृतीय क्रमांक प्राप्त दत्तप्रसाद पेडणेकर यांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे गणेशोत्सव काळात पत्रकारांसाठी आयोजित इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या पत्रकारांना मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या पारितोषिक वितरण प्रसंगी उद्योजक दत्ता सामंत, सेवानिवृत्त माहिती उपसंचालक व कातळशिल्प संशोधक सतीश लळीत, जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा पत्रकार संघांचे उपाध्यक्ष बंटी केनवडेकर, जिल्हा सदस्य अमित खोत, ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव सौगंधराज बादेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, प्रशांत हिंदळेकर यांच्यासह इतर पत्रकार आदी उपस्थित होते.
फोटो : मालवण पत्रकार समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त प्रफुल्ल देसाई यांना पारितोषिक देताना उद्योजक दत्ता सामंत सोबत अन्य मान्यवर. ( छाया अमोल गोसावी)

पत्रकार प्रफुल्ल देसाई यांचा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते सन्मान
