Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठी २४ ला निवडणूक <br>

कुडाळ न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठी २४ ला निवडणूक <br>

२० जानेवारी पर्यंत नामनिर्देश दाखल करायची मुदत

२४ जानेवारीला विशेष सभेचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.   निवडणुकीचा कार्यक्रम  जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार  शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी २४ रोजी सकाळी ११ वा विशेष सभेच आयोजन करण्यात आले आहे
      नगराध्यक्षा सौ अक्षता खटावकर यांनी नुकताच नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले होते.  त्यामुळे या नगराध्यक्षपदाचा निवड कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केला आहे. सोमवार दि. २० जानेवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने मुख्याधिकारी यांच्याकडे दुपारी २ वाजे पर्यंत  नामनिर्देशन पत्र सादर करणे आवश्यक आहे.  नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत संपल्यानंतर पिठासीन प्राधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिठासीन प्राधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व ती फेटाळण्याची कारणे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
बुधवार दि. २२  जानेवारी रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपिल दाखल करणेस मूदत, नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपील दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहिर करणे, गुरूवार दि. २३ जानेवारी रोजी वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहिर केल्यानंतर   सायंकाळी ४ वाजेपर्यंत उमेदवाराने सही केलेली लेखी नोटीस स्वतः मुख्याधिकाऱ्याकडे देवून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मूदत आहे.  शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेच्या सुरूवातीला निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करणे, त्यानंतर बाब क्र. ७ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मतदान व पिठासीन प्राधिकाऱ्यांमार्फत निकाल घोषित करणे, असा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केला आहे.

rapan bottom