दिपिका देऊलकर | मालवण : मालवण तालुक्यातील हडी येथे श्री दत्त जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा होणार आहे.
यानिमित्त १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत महाअभिषेक होणार आहे, त्यानंतर सकाळी १० ते १ या वेळेत सार्वजनिक अभिषेक होणार आहे.
सायंकाळी ७ ते ८:३० या वेळेत पूजन, दिंडी आरती होईल, त्यानंतर रात्रौ ९ ते ११ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ बिळवस यांचे वारकरी दिंडी भजन होणार आहे व त्यानंतर रात्रौ ११ वाजता स्थनिक सुस्वर भजने होणार आहेत.

१५ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

