संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप खालची माधववाडी येथे सालाबाद प्रमाणे कै. धोंडी बाबाजी माधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री दत्त मंदिरात खालची माधववाडी समस्त माधव, राणे, शिरोडकर यांच्या आयोजनाखाली दि. १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्त दत्त मंदिरात सकाळी ११ वा. श्रींची पूजा, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. दत्तजन्म सोहळा व आरती, रात्री ९ ते ११ पालखी सोहळा, रात्री १२ वा. गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ, हळवल यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोईप खालची माधववाडी येथे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन
