अदित्य बटावले | कसाल : संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम उपक्रमानी साजरी करण्यात आली. तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती कसाल ग्रामपंचायत सभागृह येथे साजरी करण्यात आली. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने छापाई होण्याऱ्या दिनदर्शिकेचे कसाल सरपंच राजन परब,सिंधुदुर्ग तेली समाज मंडळ उपाध्यक्ष निलेश कामतेकर कसाल ग्रामपंचायत सदस्य.तेली समाज बांधव यांच्या हस्ते प्रकाशन करून कसाल मधील दिनदर्शिकेच्या वाटपचा शुभारंभ करण्यात आला.एखाद्या गोष्टीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कसा करावा हे तेली समाजाकडून शिकाव असे गौरवोद्गार कसाल सरपंच राजन परब यांनी संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती कसाल ग्रामपंचायत सभागृह येथे सादरी करण्यात आली यावेळी बोलतांना आपले विचार व्यक्त केले या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसाल सरपंच राजन परब, कसाल ग्रामपंचायत अधिकारी एस बी कोकरे ,तेली समाज सिंधुदुर्ग उपाध्यक्ष निलेश कामतेकर ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर,मिलिंद सावंत,गार्गी शिर्के,तृप्ती नारकर,पुजा आंबेरकर,ग्रामपंचायत कर्मचारी-भक्ती राणे, निर्गुण,सिध्देश हिंदळेकर सिंधुदुर्ग तेली समाज कार्यकारिणी सदस्य साईनाथ आंबेरकर सल्लागार शरद कांदळकर,रामदास कामतेकर,बाळा तेली,दिनेश पेडणेकर,अनंत तेली,संदिप सातार्डेकर,अक्षय कामतेकर,राजश्री कामतेकर अशोक तेली व कसाल गावातील प्रगत शेतकरी मधुकर राणे व कसाल गावातील तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती कसाल ग्रामपंचायत येथे साजरी
