Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

बांदा येथील नट वाचनालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा येथील नट वाचनालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मिलि मिश्रा | बांदा : बांदा येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या लहान गटात दुर्वा नाटेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात प्रज्ञा मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.


(कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांनी आपले वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे.
प्राथमिक गटासाठी 'भारतीय सण व संस्कृती', माझा आवडता संशोधक डॉ. होमी भाभा हे विषय तर माध्यमिक गटासाठी 'साहित्यिक जयवंत दळवी', 'थोर उद्योजक रतन टाटा' हे विषय देण्यात आले होते.


पाचवी ते सातवी गटात प्रणिता सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुली), मैथिली सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुली)यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. या गटात सनवी देसाई (खेमराज हायस्कूल,बांदा),समृद्धी देसाई(माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते दहावी गटात मिताली कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुली), आर्या सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुली),यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.


तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नाडकर्णी यांच्या प्रतिमेला हार घालून संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शेखर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, प्रशिक्षक चंद्रकांत सावंत,अनंत भाटे,अंकुश माजगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

rapan bottom