Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांना फी सवलत मिळावी….

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांना फी सवलत मिळावी….

भाजप मालवण शहराध्यक्ष विष्णू मोंडकर यांचे सिंधुदुर्ग जलतरण संस्था उपाध्यक्ष बाबा परब यांना निवेदन

मालवण : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत मिळावी यासाठी मालवण भाजपच्या शहर मंडळ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या वतीने बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.

मालवण चिवला बीच येथे संपन्न होणाऱ्या या जलतरण स्पर्धेत राज्यासह राष्ट्रीय, अंतराराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होणे शक्य होत नसल्याने मालवण भाजपच्या वतीने बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, पंकज सादये, ललित चव्हाण, कॅलिस फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी बाबा परब यांनी मालवण भाजपच्या विनंतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी यापूर्वी दोन हजार रुपये प्रवेश फी होती. यावर्षी प्रवेश फी अडीज हजार रुपये आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना या प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असून जिल्ह्यातील स्पर्धकांकडून स्पर्धेसाठी १ हजार प्रवेश फी आकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन भाजपा शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ८ राज्य, २७ जिल्ह्यातील १,२०० स्पर्धक तर १ आंतर राष्ट्रीय स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती बाबा परब यांनी दिली.

rapan bottom