Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार मोदीजीनी थांबवावा

बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार मोदीजीनी थांबवावा

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू यांची मागणी

सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यत न्याय यात्रा काढून अत्याचार थांबणार का ?

निलेश जोशी | कुडाळ : जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? देशाच्या पंतप्रधानांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीना विनंती करून सांगीतले पाहिजे की आपण रशिया सारख्या बलाढ्य देशाला रशिया युक्रेन युद्ध थांबवायला लावले त्याचप्रमाणे बांगलादेशात हिंदूवर होणारा अत्याचार थांबवा. असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू यांनी केले आहे.
विजय प्रभू म्हणाले, बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत ही निंदनीय गोष्ट आहे. त्याचा मी काँग्रेसच्यावतीने निषेध करतो. परंतू जे सत्ताधारी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवरील आत्याचारासाठी सिंधुदुर्गात न्याय यात्रा काढत आहेत त्यांना माझी विनंती आहे त्यांनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना बांगलादेशात होत असलेला अत्याचार थाबंवण्याची विनंती करावी. आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी रशिया सारख्या बलाढ्य देशाला रशिया युक्रेन युद्ध थांबवायला लावू शकतात ते बांगलादेशासारख्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून निर्माण केलेला आणि हल्ली पर्यंत भारताच्या आज्ञेत असलेल्या बांगलादेशाला त्यांच्या देशात होत असलेले हिंदूवरील अत्याचार थांबवायला लावू शकणार नाहीत का? म्हणूनच या जिल्ह्यात बांगलादेशातील हिंदूवर होणारा अत्याचाराविरोधात न्याय यात्रा काढून आपली शक्ती फुकट घालवण्यापेक्षा पंतप्रधानाना साकडे घालावे. या जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? त्यांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीना विनंती करून सांगीतले पाहिजे की आपण रशिया सारख्या बलाढ्य देशाला रशिया युक्रेन युद्ध थांबवायला लावले त्याचप्रमाणे बांगलादेशात हिंदूवर होणारा अत्याचार थांबवा.
महाराष्ट्रातील अनेक हिंदू शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी न्याय यात्रा काढणार आहात असा प्रश्न विचारून जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय प्रभू पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे मणिपूर जळत आहे अनेक हिंदूवर अत्याचार होत आहेत जे हिंदू मणिपूर मध्ये मृत्युमुखी पडले आहेत आणि पडत आहेत ते तर भारतीय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एखादी न्याय यात्रा काढावी असा टोला त्यांनी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे हिंदू आहेत त्यांना पीक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विम्याचा हप्ता पूर्ण न भरल्यामुळे अजूनही बऱ्याच हिंदू शेतकऱ्यांना विमाची नुकसानभरपाई मिळालेली नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कधी न्याय यात्रा काढणार आहात असा सवाल विजय प्रभू यांनी केला आहे.

rapan bottom