वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथे व्यापारी मेळावा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ३१जानेवारी २०२५ रोजी वैभववाडी येथे जिल्हा व्यापारी मेळावा होत आहे. या निमित्ताने वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापारी मेळावा कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. मंडळाचे जेष्ठ व्यापारी श्री. बाळा पारकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नारकर, खजिनदार नितीन महाडिक, जेष्ठ व्यापारी घोणे मामा, संजय लोके, बंडू सावंत, मनोज मानकर, संतोष कुडाळकर, बंडू गाड, भुईबावडा व्यापारी संघांचे तुकाराम प्रभू, मंगेश गुरव, रवी मोरे, बाजारपेठेतील सर्व व्यापारी तसेच महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

