मिली मिश्रा | माडखोल : माडखोल येथील विद्युत खांबावर काम करत असताना रुपेश अनंत डांगी ( वय 30 )रा. महादेवाचे केरवडे,कुडाळ या वीज कामगाराचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. त्यांना त्वरित उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजेचा शॉक लागून वीज कामगाराचा मृत्यू
