आचरा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे सोमवारी सकाळी ग्रामपंचायत तोंडवळी मार्फत तोंडवळी,तळाशील भागातील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला.
या मोहीमेचा शुभारंभ तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचा हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी उपसरपंच हर्षद पाटील,ग्रामसेवक युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अनन्या पाटील, मानसी चव्हाण, नरेंद्र मेस्त,भुपाल मालंडकर,गिता पाटील , तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निलेश पाटील,राजा पेडणेकर, सुचिता तारी आदी उपस्थित होते.

