मिली मिश्रा | वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी चार फिरत्या पथकांद्वारे वेंगुर्ला शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते,फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा २६ जणांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे ५ किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन प्रती ५००/- रुपये याप्रमाणे रु. १२,७००/- एवढया रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिनांक १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केलेली आहे.
महाराष्ट्र प्लास्टिक आणि ठरमोकॉल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५००० हजार रुपये दंड आकारण्याची तर करण्यात आली आहे. वेंगुर्ला शहराततील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा ऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनगृती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे वेंगुरला नगर परिषदेमार्फत नियमित करण्यात येते.
वेंगुर्ले शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये,अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपरिषद प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

