मालवण : आनंदयात्री वाड्मय मंडळ वेंगुर्ले आयोजित जिल्हा स्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या कविता या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
आनंदयात्री वाड्मय मंडळ, वेंगुर्ले यांनी त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्त जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धमध्ये प्रा. नागेश कदम यांच्या कविता या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचे रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी गोखले कॉलेज कोल्हापूर, प्रा. डॉ. पी.के. पाटील, जेष्ठ साहित्यिका डॉ. माधुरी शानभाग, डॉ. आनंद बांदेकर, अँड. विलास कुवळेकर, मंडळ अध्यक्षा वृंदा कांबळी, डॉ. एम. बी. चौगुले आदी उपस्थित होते.
प्रा. नागेश कदम यांच्या या सुयशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

