सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन….
सिंधुदुर्ग भूमी ही नर रत्नाची खाण म्हणून ओळखली जाते. अनेक रत्न ही भूमी घडवत आहे. अश्या या सिंधु भूमितील अशोक सावंत हे एक व्यक्तिमत्व होय. खा. नारायण राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते ही ओळख अशोक सावंत यांनी नेहमीच जपली. राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता हेच पद आपल्यासाठी सर्वोच्च पद असल्याचे अशोक सावंत नेहमीच सांगतात.
सामाजिक आणि राजकीय पटलावर कार्यरत असलेल्या अशोक सावंत यांचा राजकीय प्रवास शाखाप्रमुख पदापासून सुरू झाला. मालवण पंचायत समिती सभापती ते सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अध्यक्ष अशी विविध पदे भूषवणारे हे नेतृत्व पक्ष संघटनेतही प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे.
पद, प्रतिष्ठा या सर्वांपेक्षा राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता हेच पद आपल्यासाठी सर्वोच्च आहे. असे अभिमानाने सांगणारे अशोक सावंत हे निश्चितच कार्यकर्त्यांच्या क्षितिजावर आपले स्थान अधोरेखित करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तीन दशकांपेक्षा जास्तकाळ सक्रिय राजकारणात कार्यरत असताना कोणताही स्वार्थपणा न ठेवता स्वच्छ प्रतिमा आणि निष्ठेचा एक आदर्श त्यांच्या माध्यमातून प्रस्तापित केला जातो. म्हणूनच निष्ठेच्या तराजूत अशोक सावंत हे नाव आजही आपले स्थान टिकवून आहे.
आदरणीय माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खा. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले अशोक सावंत राणेंच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक…. सावंत यांनी पक्षाची जिल्ह्यास्तरावरील विविध पदे भूषवली… आजच्या घडीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अशोक सावंत पक्षीय जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत… पक्ष नेतृत्व देईल ती जबाबदारी प्रामाणिक पणे पूर्ण करणे… पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होणे… पक्ष स्तरावरील त्यांचे योगदान आदर्शवत असेच आहे.
या माणसाबद्दल लिहिण्यासारखे भरपुर आहे. हे नेतृत्व शब्दात मावणारे नाही. यांच्या कार्याची खोली मोठी आहे. अखंड ऊर्जेचा अशोक सावंत हा एक स्रोत आहे. या व्यक्तीची क्षमता निश्चितच व्यापक आहे. राजकीय व सामाजिक स्तरावरील अनुभव प्रचंड आहे. मात्र नारायण राणेंचे विश्वासू ही ओळखच आपल्यासाठी सर्वोच्च आहे. हे अशोक सावंत यांचे नेहमीचे वाक्य त्यांचा मोठेपणा व नेत्याबद्दल असलेली निष्ठा स्पष्ट करते.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे. गोरगरीब जनतेस जेवढे शक्य होईल त्या प्रमाणात मदतीचा हात देणे. मात्र या हाताने दिलेले त्या हाताला समजता नये… हे तत्व सावंत कायम जपतात… वीज कंत्राटी कर्मचारी यांचे नेतृत्व करताना त्यांचा आवाज बनून त्यांना न्याय देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. अशोक सावंत हे असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी राजकीय पटलावर काम करताना आपले नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनखाली नेहमी काम केले. राणे साहेबांच्या विचाराचे व पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते वाढवणे हेच धेय्य ठेवले. म्हणूनच अशोक सावंत यांचे कार्य निष्ठेच्या तराजूत आदर्श व सर्वोच्च ठरते….
अश्या या स्वच्छ प्रतिमेच्या निष्ठावंत व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…सावंत साहेब, राजकीय, सामाजिक व व्यावसायिक जीवनातील आपली वाटचाल अधिकाधिक यशाची शिखरे सर करणारी ठरो… आपणास व आपल्या कुटुंबास निरोगी दीर्घायुष्य लाभो… हीच श्री देव रामेश्वर चरणी प्रार्थना…

