Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित ऑलिम्पिक मध्ये नेत्रदीपक यश

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित ऑलिम्पिक मध्ये नेत्रदीपक यश

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ येथे अध्ययन संस्थेच्या वतीने शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या त्रिकोणमिती आणि अपूर्णांक या विषयांवर आधारित गणित ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत कुडाळमधील अनेक नामांकित शाळांचा समावेश होता.


कुडाळमधील नऊ शाळांच्या सहभागाने रंगलेल्या त्रिकोणमिती ऑलिम्पिक मध्ये बॅ. नाथ पै स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले. यात निरंजन कुशे (इयत्ता 9वी) आणी मनस्वी परब (इयत्ता 8वी) यांनी या स्पर्धेत विशेष कौशल्य दाखवत शाळेच्या यशाचा झेंडा रोवला. तसेच अपूर्णांक ऑलिम्पिकमध्ये कुडाळमधील 5 शाळांचा सहभाग होता. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येथेही आपली सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला, यात मानव तवटे (इयत्ता 6 वी) आणि वेदांत शृंगारे (इयत्ता 7 वी) यांनी आपल्या अचूक उत्तरांनी परीक्षकांची मने जिंकली.


विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेच्या गणित शिक्षिका प्राची बर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या गौरवशाली यशाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर , प्राचार्या चैताली बांदेकर, तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

rapan bottom