Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाजपच्या प्रयत्नातून मालवण बसस्थानक येथे बायोटॉयलेट उपलब्ध

भाजपच्या प्रयत्नातून मालवण बसस्थानक येथे बायोटॉयलेट उपलब्ध

मालवण | प्रतिनिधी : मालवण एसटी स्थानक परिसरात नव्या इमारतीचे काम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्वच्छता गृहाची दुरावस्था झाल्याने समस्या निर्माण झाली होती. स्वच्छता गृहाची सोय नसल्याबद्दल प्रवासी वर्ग व नागरिकांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे तक्रारी मांडल्यानंतर मालवण शहर भाजपच्यावतीने मालवण आगार व मालवण नगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून मालवण नगरपालिकेने बस स्थानक परिसरात बायोटॉयलेट उपलब्ध करून दिले आहे, अशी माहीती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

मालवण बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम गेली काही वर्षे सुरु असून या दरम्यान बस स्थानक परिसरात स्वच्छता गृहाची योग्य सोय नसल्याने महिला व प्रवासी वर्गाची गैरसोय होत होती. विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान याबाबत प्रवासी वर्गाने खास. नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण आगाराच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आगाराने मालवण नगरपालिकेकडे असणारे बायोटॉयलेट तात्पुरत्या स्वरूपावर देण्यासाठी मागणी करावी असे सांगितले होते. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचेही लक्ष वेधून बायोटॉयलेट देण्याची मागणी केली. या पाठपुराव्यानंतर मालवण नगरपालिकेने बस स्थानकासाठी बायोटॉयलेट उपलब्ध करून दिले असून भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते आगाराला सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, पूजा वेरलकर, आबा हडकर, राणी पराडकर, उत्तम पेडणेकर, किशोर खानोलकर, श्री. केळूसकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी मालवण आगारात उपस्थितीत असलेले एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या बायोटॉयलेटच्या देखभाल व स्वच्छतेकडे आगाराने लक्ष द्यावे अशी मागणी केली. तसेच मालवण बस स्थानकाच्या इमारतीला पर्यटनाची प्रतिमा देण्यात यावी, तसा कलर लूक द्यावा. तसेच या इमारतीमध्ये पर्यटन माहिती केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणीही केली.

rapan bottom