मिली मिश्रा | बांदा : बांदा येथील नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.सावंत यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाहक राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पांढरे, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, प्रवीण परब, सौ. स्वप्निता सावंत, ग्रंथपाल सुष्मिता नाईक,सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू अमिता परब यांच्यासह वाचक उपस्थित होते. यावेळी अनंत भाटे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले व आभार राकेश केसरकर यांनी मांडले

