मिली मिश्रा | वेंगुर्ला : दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. सन 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. अपंगांचे प्रश्न जाणून त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घ्याव्यात आणि यातूनच समाजातील अनेक लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
दरवर्षी भाजप वेंगुर्ले च्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी वेंगुर्ले शहरातील सचिन पालव यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जन्मजातच दृष्टीहीन असलेले सचिन पालव यांनी केली अनेक वर्षे संगीत साधना करून अंधत्वावर मात करून जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला ,हार्मोनियम व गायन या तीनही विषयांमध्ये विशारद पदवी प्राप्त करून समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला. याबद्दल त्याचा भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंढळकर,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जी.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर नगरसेवक प्रशांत आपटे, युवा मोर्चाचे प्रणव वांगणकर व मनोहर तांडेल, बूथ प्रमुख सुधीर पालेकर ,शेखर काणेकर रविंद्र शिरसाट ,भाई पालव इत्यादी उपस्थित होते.

