Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांना बचाव कार्य प्रशिक्षण

NDRF चे २० जणांचे पथक दाखल

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सहकार्याने NDRF पथकामार्फत १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) पुणे यांच्या २० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
या पथकामार्फत मालवण तालुक्यातील टोपीवाला हायस्कूल मालवण, राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्यू. कॉलेज सावंतवाडी, शिवाजी इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज पणदूर येथे शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा १ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अग्नी सुरक्षा, प्रथमोपचार, पाण्यातील बचाव कार्य इ.बाबत प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. तसेच शाळेत आग लागल्यास किंवा भूकंप झाल्यास वर्गातील विद्यार्थ्यांना शिस्तबद्धरित्या शाळांतून बाहेर कसे काढावे याबाबतची रंगीत तालीम शाळांमध्ये घेण्यात आली. सर्व प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला मुठ बंदर येथे मच्छिमार यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. मालवण बंदर जेट्टी येथे मच्छिमार व जलक्रीडा व्यावसायिकांसाठी प्रादेशिक बंदर अधिकारी, यांच्या सहकार्याने पाण्यातील बचाव कार्याची माहिती देणारे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण NDRF पथकामार्फत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा एकूण ६७ मच्छिमार व जलक्रीडा व्यावसायिकांनी लाभ घेतला. प्रशिक्षणात पाण्यातील बचाव कार्य, प्रथमोपचार, CPR इ.बाबत प्रशिक्षण देण्यात आले. वरील सर्व प्रशिक्षणास संबंधित तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom