मिली मिश्रा । वैभववाडी : असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी एनालिस्ट अँड प्रॅक्टिस(ACLAP) या महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारकांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर ( वैभववाडी) सिंधुदुर्ग यांची तर महाराष्ट्र राज्य सचिव पदी रमेश चौगुले (इचलकरंजी) कोल्हापूर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शिर्डी येथे पार पडलेल्या अक्लाप या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बैठकीत ही निवड बिनविरोध पार पडली. उपाध्यक्षपदी गणेश बंधारे (नांदेड) खजिनदारपदी उमेशचंद्र सोनार (नंदुरबार) तर सहसचिव पदी राजेश गरुड (परभणी) यांची निवड आली. कै. अण्णासाहेब करोले यांनी स्थापन केलेल्या अक्लाप ही राज्यव्यापी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात लॅब धारकांच्या न्याय हक्कांसाठी लढत असलेली सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्रातून नुकतीच 21 जिल्हा अध्यक्ष राज्य कार्यकारणी निवड प्रक्रिया पार पडली होती. नूतन कार्यकारणी बैठक शिर्डी येथे पार पडली यात 21 राज्य प्रतिनिधी वरील निवड बिनविरोध केल्या गेल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील कौतुक होत आहे.
अक्लाप संघटनेच्या पदाधिकारी निवडीत कोकण विभागाला प्रथमच स्थान मिळाले असून प्रशांत गुळेकर हे राज्याध्यक्ष झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. या निवडीसाठी धनंजय डबीर (नाशिक) कुमार पाटील (अहिल्यानगर) रघुनाथ भोंगळे (पुणे) अनिल राठी (संगमनेर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

