वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड- पेंडूर येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव आज शुक्रवार दि ६ डिसेंबर रोजी आहे.
आज सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमांर्तडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे.
३६० चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच्चगण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे.विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे.या ठिकाणीं वार्षिक जत्रोत्सवाला कोंबडा देऊन नवस फेडतात.हे या या उत्सवाचे विशेष आहे.तसेच शरीराच्या कुठल्याही अवयवांच दुखंण असेल तर येथे नवस बोलला जातो.हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते.

