मिली मिश्रा | कुडाळ : गोवा बनावटीच्या दारूच्या अनैतिक व्यवसायामध्ये सावंतवाडी शहरातील अनेक युवक अडकलेले आहेत आणि याची पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे माहिती आहे. पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे अनैतिक धंदे अनेक दिवसांपासून चालू आहेत आणि या व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ आहे.हे सर्व अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा अन्यथा मनसे तीव्र आंदोलनचा इशारा देत मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की ह्या अनैतिक व्यवसायांमुळे चरस, गांजा गोवा बनावटी दारु याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने हि युवापिढी बरबाद होत आहे.आणि अनेक युवक व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत.तरी या निवेदनाव्दारे आपल्याकडे मागणी करण्यात येत आहे की, हे अवैद्य धंदे तात्काळ ८ दिवसांत बंद करण्यात यावे. आपल्या खात्याकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सावंतवाडी पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करणार असून सर्वस्वी आपणांस जबाबदार धरण्यात येईल.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.

